
सोलापूर: विधिमंडळात मंत्री संजय शिरसाट यांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप शिवा संघटनेतर्फे करण्यात आला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी कोंतम चौकात मंत्री शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारत संताप व्यक्त करत निषेध आंदोलन केले.