Shivjayanti: शिव जन्मोत्सवाचा भव्य पाळणा सोहळा! आपला उत्साह बाजूला ठेवून शिवप्रेमींनी करून दिला रुग्णवाहिकेला रस्ता

Shivjayanti in Solapur शिव जन्मोत्सवाचा भव्य पाळणा सोहळा! रस्त्यावर लाखोंची गर्दी, रुग्णाला घेऊन वेगाने आलेली रुग्णवाहिका, रुग्णालयात जाण्याची घाई... पुढे असे काय झाले की सर्वांनाच कौतूक वाटले.
Shivjayanti in Solapur
Shivjayanti in SolapurSakal

सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर रविवारी मध्यरात्री रात्री बारा वाजता श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे आयोजित भव्य पाळणा सोहळ्याला लाखोंची गर्दी झाली होती.

त्यावेळी एक रुग्णवाहिका सायरन वाजवत गर्दीच्या दिशेने वेगाने येत होती आणि क्षणात आपला उत्साह बाजूला ठेवून शिवप्रेमींनी गर्दी पांगवत या रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला. हे दृश्य पाहत असताना अनेकांचा श्वास क्षणभर रोखला गेला. एका रुग्णाला जीवनदान देण्यासाठी शिवप्रेमीनी इतक्या गर्दीतही आपले कर्तव्य पार पाडल्याने पोलिसांनी सर्वांचे आभार मानले.

शिवजन्मोत्सव पाळणा सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ मा साहेबांच्या सिंदखेड राजा येथील वंशज संगीताराजे शिवाजीराजे जाधवर, कोंढाणा किल्ला आपल्या तलवारीच्या जोरावर सर करणारे सरसेनापती तानाजी मालुसरे यांचे वंशज शीतल मालुसरे, रायबा मालुसरे, दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुंखे, महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, धर्मदाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांच्यासह वीरपत्नी वर्षा श्रीहरी लटके, देवकी रत्नाकर हडपद, रेखा शावरे, सुरेखा जयहिंद पन्हाळकर, कांताबाई भोसले, रत्‍नाबाई बाबुराव चांदोडे, सुषमा दत्तात्रेय माने यांच्या हस्ते पाळणा उत्सव संपन्न झाला.

या पाळणा सोहळ्यासाठी महिलावर्ग नऊवारी साडी आणि पारंपारिक वेशभूषा करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात जमल्या होत्या. पुढच्या दीड- दोन तासात चौकात लाखोंची गर्दी जमा झाली. शिवव्याख्याते दीपकराव करपे यांचे राजमाता जिजाऊ मासाहेब, वीरांगणा व लोकशाहीमधील रणरागिनी, न उमजलेले छत्रपती शिवराय या विषयावर रात्री दहा ते अकरा या वेळेत त्याठिकाणी व्याख्यान सुरू होते.

पाळणा उत्सव यशस्वी होण्यासाठी यांचे परिश्रम

हा पाळणा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, सचिव प्रीतम परदेशी, खजिनदार अंबादास शेळके, ट्रस्टी सदस्य पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, शिवाजीराव घाडगे, दिलीप कोल्हे, विक्रांत वानकर, अनिकेत पिसे, प्रभाकर रोडगे, विनोद भोसले यांच्यासह उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, खजिनदार सुशील बंदपट्टे, कार्याध्यक्ष रवी मोहिते, उपाध्यक्ष अर्जुन शिवसिंगवाले, अंबादास सपकाळे यांनी परिश्रम घेतले.

पोलिसांची सतर्कता व शिवप्रेमींची सामाजिक बांधिलकी

छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाळणा कार्यक्रमासाठी अंदाजे एक लाखांची गर्दी होती. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली चौकामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात होता.

दरम्यान, पुणे, बार्शी महामार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एकमेव रस्ता आहे. पाळणा उत्सव सुरू होण्याच्या काही क्षण अगोदर रुग्णाला घेऊन एक रुग्णवाहिका शासकीय रुग्णालयाकडे वेगाने जात होती.

गर्दीमुळे रुग्णवाहिका कशी जाणार असा सर्वांनाच प्रश्न पडला, पण चौकात आलेली रुग्णवाहिका शिवप्रेमींच्या शिस्तीमुळे काही क्षणात पुढे रवाना झाली.

या कार्यक्रमावेळी एक नव्हे दोन रुग्णवाहिका आल्या, पण लाखोंची गर्दी क्षणात बाजूला सरली आणि शिवप्रेमींनी त्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली, त्याबद्दल सहायक पोलिस आयुक्त राजन माने यांनी सर्वांचेच कौतुक करत आभार मानले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com