

Family Feud Ends in Bloodshed: Contract Teacher Arrested After Fatal Knife Attack
sakal
सोलापूर : कौटुंबिक वादातून जावई सादिक दफेदार (रा. पानमंगळूर, ता. अक्कलकोट) याने मंगळवारी (ता. २४) सकाळी सासरे सिकंदर शेख (वय ६२, रा. इंगळगी, ता. दक्षिण सोलापूर) यांच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून खून केला. त्यानंतर स्वत:च्या गळ्यावर देखील वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी जखमी सादिक दफेदारविरुद्ध वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.