धक्कादायक! लग्न लावून देत नाही म्हणून नातवाने केला आजीचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लैंगिक अत्याचार करून 16 महिन्याच्या पोटच्या चिमुकलीचा खून!
धक्कादायक! लग्न लावून देत नाही म्हणून नातवाने केला आजीचा खून

धक्कादायक! लग्न लावून देत नाही म्हणून नातवाने केला आजीचा खून

सोलापूर : शेळगी येथील मित्र नगरात राहणाऱ्या मालनबी हसनसाब नदाफ (वय ७०) यांचा खून त्यांच्याच नातवाने केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. सलीम जहाँगीर नदाफ (वय २५)असे त्या नातवाचे नाव असून जोडभावी पेठ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: विद्यापीठाची सत्र परीक्षा ऑफलाईनच! दररोज दोन पेपर, जाणून घ्या वेळापत्रक

घटनेची हकीकत अशी, कर्नाटकात राहणाऱ्या सलिमला त्याची आजी मालनबी यांनी काही वर्षांपूर्वी सोलापुरात बोलावून घेतले होते. मित्र नगरातील बाबासाब हसनसाब पटेल यांच्या घरात ते भाड्याने राहायला होते. सलीम हा तिसरीपर्यंतच शिकला आहे. त्याचे वय २५ सरल्याने तो आजीकडे सारखा विवाह लावून देण्यासाठी मागे लागला होता. आजीचे वय झाले होते, त्यातच सलीम काही कामधंदाही करीत नव्हता. त्यामुळे त्याच्या मागणीकडे आजीने गांभीर्याने पाहिले नाही. घरातील कामे आटोपून मालनबी या शनिवारी (ता. १४) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घराबाहेर बसल्या होत्या. आपल्या आयुष्याचा तो अखेरचा दिवस ठरेल, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. बाहेरून आलेला नातू सलीम याने आजीकडे पैसे मागितले. पैसे दिले नाहीत म्हणून चिडलेल्या सलीमने काठी घेतली आणि आजीच्या डोक्यात घातली. त्यात आजी जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडली. नातेवाईकांनी तिला सिव्हिल हॉस्पिटलला नेले. पण, उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. फिरोज शकुर नदाफ यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाणे गाठले आणि सलीमविरूध्द फिर्याद दिली. पोलिसांना त्याला तातडीने अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत असून पोलिस उपनिरीक्षक संजिवनी व्हट्टे या अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा: ठाकरे सरकारची नवी यंत्रणा! नैसर्गिक आपत्तींवेळी आता लगेच मिळणार मदत

आजीकडे ‘तो’ मागत होता ५०० रुपये
सलीमच्या आईचा तो लहान असतानाच मृत्यू झाला होता. वडिलांनीही दुसरे लग्न केल्याने त्याचा सांभाळ आजी करीत होती. कर्नाटकातील जिरंकली येथून आजीने त्याला सोलापुरात बोलावून घेतले होते. याठिकाणी तो काहीच काम करीत नव्हता. माझे लग्न करून दे म्हणून तो आजीकडे सारखा तगादा लावत होता. आजीने त्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे कर्नाटकला जाण्यासाठी तो आजीला पाचशे रुपये मागत होता. आजी पैसेही देत नसल्याच्या रागातून त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Shocking Granddaughter Kills Grandmother For Not Getting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top