

Safety Breach in Society: Minor Girl Targeted by 63-Year-Old Watchman Inside Office Premises
sakal
सोलापूर : जुळे सोलापुरातील एका गृहनिर्माण सोसायटीतील वॉचमननेच तेथील अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केले आहे. तेथील पालकांनी त्याला पकडून पोलिस ठाण्यात आणले. विजापूर नाका पोलिसांनी त्याला अटक केली होती. आता तो न्यायालयीन कोठडीत आहे. राजू शंकरराव रंगदळ (वय ६३) असे त्या संशयिताचे नाव आहे.