

“Solapur: Youth assaulted over group dispute; police arrest three accused.”
sakal
सोलापूर : येथील राहुल गांधी झोपडपट्टीतील सुफियान आत्तार या तरुणाला इन्स्टाग्रामवरील आमच्या ग्रुपमध्ये सहभागी हो म्हणून १८ जणांनी मारहाण केली. या मारहाणीत एकाने सुफियानच्या कपाळावर व हातावर चाकूने वार केले. त्याच्या फिर्यादीवरून १८ जणांविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.