
सोलापूर : प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला सुखरूप डिलिव्हरी होईल म्हणून दिवसभर गोलचावडी रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या महिलेचा बाळासह मृत्यू झाला. विवाहितेच्या पतीच्या तक्रारीवरून मेडिकल बोर्डाने त्यासंदर्भातील चौकशी केली. चौकशीअंती यात डॉ. सुनिता देगावकर यांची चूक असल्याची बाब समोर आली आणि त्यावरून त्यांच्याविरुद्ध आता जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.