Solapur News : दिव्यांगांसाठी सायकलवरील दुकान; सोलापुरातील सायकल डिझाइनर फारुख सय्यद यांची कमाल

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील दिव्यांगाना आपल्या दिव्यांगत्वावर मात करुन स्वत:चा व्यवसाय थाटण्याचा आत्मनिर्भरपणा येणार
shop on bicycles for disabled persons by Farrukh Syed bicycle designer from Solapur
shop on bicycles for disabled persons by Farrukh Syed bicycle designer from SolapurSakal

सोलापूर: सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील दिव्यांगाना आपल्या दिव्यांगत्वावर मात करुन स्वत:चा व्यवसाय थाटण्याचा आत्मनिर्भरपणा येणार आहे. त्यासाठी पुण्याचे वरदान लाभत आहे. दिव्यांगांना व्यवसाय करता यावा, यासाठी चक्क सायकलवरच दुकानाची निर्मिती करण्यात आली आहे. दिव्यांग लोक सायकलवर आपले दुकान थाटून स्वाभिमानाने जीवन जगू शकणार आहेत.

पुण्याच्या रोटरी क्लबने सोलापुरातील सायकल डिझाइनर फारुख सय्यद यांच्याकडून दोन्ही पायाने अधू असलेल्या दिव्यांगासाठी सायकलवरील चालते दुकान करून घेतले आहे. त्याचा उपयोग करून कोणताही दिव्यांग सहजपणे या वाहनाच्या मदतीने व्यवसाय करू शकतो. या मॉडेलचा उपयोग पुढील काळात दिव्यांग कल्याण योजनेत होण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या रोटरी क्लबने दिव्यांगाना सायकलवर बसून त्यांचा व्यवसाय करता यावा यासाठी सायकल चालणारे दुकानाचे मॉडेल उपलब्ध करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सोलापूरचे सायकल डिझायनिंग व मॉडिफिकेशनचे काम करणारे फारुख सय्यद यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा श्री. सय्यद यांनी त्यावर काम करण्यास सुरवात केली.

मुळातच दिव्यांगांची सायकल ही हाताने चालवावी लागते. तसेच त्यावर बसण्याची जागा व एकूण तीन चाके यामुळे ती वजनदार असते. ही वजनदार सायकल हाताने पॅडल फिरवून चालवणे कष्टदायक असते. सुरवातीला त्याला थोडा धक्का द्यावा लागतो. यामुळे या सायकलवर दुकानाचे कमी वजनाचा डिझाईन करून ही सायकल सहज चालवता आली पाहिजे याचे आव्हान होते.

फारुख सय्यद यांनी हे आव्हान पेलत कामाला सुरवात केली. त्यांनी सायकलच्या मागील तीन भागात दुकानाचे सामान ठेवता येईल असे फ्रेमवर्क तयार केले. या मध्ये काही बरण्या, विक्रीचे पाऊच लावता येतील अशी सुविधा उपलब्ध केली. दिव्यांगाना स्वावलंबी करणाऱ्या शासकीय योजनांमध्ये या मॉडेलचा समावेश होऊ शकतो.

- सहा फूट उंचीचे दुकानाची फ्रेम

- सायकल चालवण्याचा हलकेपणा ९० टक्क्यापर्यंत वाढवला

- किमान १५ बरण्या दुकानात ठेवता येतील.

- दोन्ही बाजूने पाऊच अडकविण्याची सुविधा

- हलक्या वजनाच्या पोकळ पाइपचा वापर

- २० दिवसात सायकलचे डिझाईन तयार केले

- दिव्यांगाकडून सायकलची चाचणी यशस्वी

दिव्यांगाच्या सायकली या कमीत कमी वजनाच्या व चालवण्यासाठी सर्वाधिक हलक्या असाव्यात असा प्रयत्न सातत्याने करत आहे. मात्र पुण्याच्या रोटरी क्लबने सायकलवरील फिरते दुकान तयार करून देण्यास सांगितले. त्यानुसार हे मॉडेल केले. दिव्यांगाकडे असलेल्या पूर्वीच्या सायकलीमध्ये फेरबदल करुन देता येईल.

- सय्यद फारुख, सायकल डिझायनर, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com