
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जलद व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीमार्फत टोकन दर्शन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचा प्रथम चाचणीचा समारंभ आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आला.