
सोलापूर : शहरातील शहा नगर हौसिंग सोसायटीतील श्वेता शिवाजी जाधव हिने जिद्द आणि कष्टाच्या बळावर अशक्य ते शक्य कसे होते हे दाखवून देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासकीय अधिकारीपदाला गवसणी घातली आहे. तिचा ए. जी. पाटील शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तंत्रनिकेतनमधील विविध विभागाचे शिक्षक उपस्थित होते.