Solapur : सिद्धेश्वर साखर कारखान्यासाठी आजपासून स्वीकारणार उमेदवारी अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धेश्वर साखर कारखान्यासाठी आजपासून स्वीकारणार उमेदवारी अर्ज

सिद्धेश्वर साखर कारखान्यासाठी आजपासून स्वीकारणार उमेदवारी अर्ज

सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी शुक्रवारपासून (ता.२६) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिली.

या साखर कारखान्यासाठी २०२१-२२ ते २०२६-२७ या पाच वर्षाकरिता २० संचालक निवडले जाणार आहेत. अंतिम मतदार यादी उद्या (शुक्रवारी) जिल्हा उपनिबंधक कार्यालयात प्रसिद्ध होणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी २८ हजार ५४६ मतदार मतदानाचा हक्क बजावण्याची शक्‍यता आहे. ऊस उत्पादक सभासदांमधून १५ संचालक निवडले जाणार आहेत. ऊस उत्पादक सभासदांमधून अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील दोन संचालक, ऊस उत्पादक सभासदांमधून दोन महिला संचालक निवडून दिले जाणार आहेत. बिगर ऊस उत्पादक सहकारी संस्था सभासदांमधून एक संचालक निवडला जाणार आहे.

अर्जाची छाननी ३ डिसेंबरला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ ते १२ डिसेंबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ ही मुदत आहे. उमेदवारांची अंतिम यादी चिन्हासह १३ डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी २६ डिसेंबरला होणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांनी दिली.

सिद्धेश्वर कारखान्यासाठी असे असणार मतदार

अक्कलकोट तालुका : ९ हजार १६७

दक्षिण सोलापूर तालुका : १३ हजार २४

उत्तर सोलापूर तालुका : ३ हजार ३२५

मोहोळ तालुका : १ हजार ५७४

तुळजापूर तालुका : १ हजार २६१

कर्नाटकातील सभासद : १०९

सोसायटी सभासद : ८६

एकूण सभासद : २८ हजार ५४६

loading image
go to top