श्रावण विशेष : सिद्धेश्‍वर मंदिर अन्‌ तलावाची सर्वदूर महती

श्रावण विशेष : सिद्धेश्‍वर मंदिर अन्‌ तलावाची सर्वदूर महती
श्रावण विशेष : सिद्धेश्‍वर मंदिर अन्‌ तलावाची सर्वदूर महती
श्रावण विशेष : सिद्धेश्‍वर मंदिर अन्‌ तलावाची सर्वदूर महतीCanva
Summary

श्रावण महिन्यात शिवयोगी सिद्धरामेश्‍वरांच्या समाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी अवघे शहर लोटत असते.

सोलापूर : सोलापूर (Solapur) म्हटलं की गड्डा यात्रा आणि सिद्धेश्‍वर मंदिर (Siddheshwar Temple) व तलावाचे कुतूहल देशभरातील लोकांना आहे. या मंदिराला भेट देण्याची ओढ सर्वांनाच असते. विशेषत: मकर संक्रांतीला (Makar Sankranti) भरणारी यात्रा आणि नंदीध्वज मिरवणूक, अक्षता सोहळ्यामुळे हे देवस्थान सर्वदूर परिचित आहे. श्रावण महिन्यात शिवयोगी सिद्धरामेश्‍वरांच्या योगसमाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी अवघे शहर लोटत असते. सध्या सिद्धेश्‍वर मंदिर परिसराचा चेहरामोहरा नूतनीकरणामुळे बदलत आहे. तलावातील कारंज्यांसह तलावाभोवतीचा आकर्षक पदपथ व बाबा गाडी यांची प्रतीक्षा संपूर्ण सोलापूरकर करत आहेत.

श्रावण विशेष : सिद्धेश्‍वर मंदिर अन्‌ तलावाची सर्वदूर महती
तुम्हाला लगेच नोकरी हवीय का? सोलापूर विद्यापीठात 114 कोर्सेस

मंदिराशेजारील होम मैदानाचे सुशोभीकरण आणि सेल्फी पॉईंट आता लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मागील अनेक दिवसांत कर्नाटक व आंध्र प्रदेशासह राज्यातील भाविकांसाठी हे मंदिर नेहमी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. सोलापूरला समुद्र नाही, मोठी नदी नाही ही उणीव भरून काढणारा सिद्धेश्‍वर तलाव आहे. या तलावाचे सौंदर्य पाहणे, तलावात नौकानयन करणे आणि सायंकाळी तलावात फुललेली कमळे आणि मुक्त विहार करणारे मासे पाहणे, हा एक आगळावेगळा अनुभव असतो. सध्या नूतनीकरणासाठी तलाव कोरडा केला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर भरलेल्या तलावाचे सौंदर्य पाहण्याची अनुभूती घेता येईल.

जवळची प्रेक्षणीय ठिकाणे...

  • होम मैदान : सिद्धेश्‍वर मंदिराशेजारील होम मैदानाचे नूतनीकरण करण्यात आले असून आकर्षक सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे.

  • भुईकोट किल्ला : मंदिराला लागूनच सोलापूरचा भुईकोट किल्ला आहे.

  • दर्गा : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक व सिद्धरामेश्‍वरांचे समकालीन सहकारी महान सूफी संत हजरत पीर सय्यद शाहजहूर अली दर्गाह

  • रिपन हॉल : पूर्वीचा रिपन हॉल म्हणजे सध्याचे पासपोर्ट कार्यालय. ही इमारत ब्रिटिशकालीन स्थापत्यशैलीतील अप्रतिम नमुना आहे.

  • भाजी मंडई : राणी लक्ष्मीबाई भाजी मंडईची उत्कृष्ट इमारत

श्रावण विशेष : सिद्धेश्‍वर मंदिर अन्‌ तलावाची सर्वदूर महती
एअरोस्पेस क्षेत्रात धनंजयची भरारी! युरोपियन कंपनीसोबत सामंजस्य करार

उपदेवता...

सिद्धेश्‍वर मंदिरात सिद्धेश्‍वराच्या मुख्य मंदिराबरोबरच सिद्धरामेश्‍वरांची शिवयोगी समाधी आहे. श्रावणात या समाधीला विलोभनीय फुलांची सजावट केली जाते. याशिवाय अनेक ठिकाणी विविध लिंग आहेत. अनेक उपदेवता आहेत. संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे वडील विठ्ठलपंतांनी स्थापन केलेली श्री विठ्ठल- रुक्‍मिणीची मूर्ती आहे. वीरभद्रेश्‍वर मंदिर पाहण्यासारखे आहे.

खरेदीसाठी जवळची ठिकाणे

  • नवी पेठ ही शहरातील मुख्य बाजारपेठ जवळच

  • याशिवाय पार्क स्टेडियम सभोवती अनेक व्यापारी दालने

  • पंचकट्टा, पार्क व किल्ला बाग येथील चौपाटी

  • विजापूर वेस येथील प्रसिद्ध जिलेबीसह अनेक खाद्यपदार्थांची दुकाने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com