
Mohol Youth Provide Aid Amid Mass Evacuation Along Sina River
Sakal
मोहोळ: सीना नदीच्या पाण्याने संकट ओढावलेल्या मोहोळ तालुक्यातील विविध गावातील स्थलांतरित केलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी व त्यांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी मोहोळ येथील शिवाजी चौकात सामाजिक काम करणारे विविध जाती-धर्मातील युवक सरसावले आहेत. त्यांनी समाज माध्यमावर मदतीचे आवाहन करताच बघता बघता सुमारे पाच टमटम खाद्यपदार्थ संकलित झाले. ते पदार्थ संकटग्रस्त नागरिकांपर्यंत पोचही झाले आहे. यामुळे संकटग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.