
"Flooded homes and fields in Sina River area as water begins to recede; residents stay in temporary shelters."
esakal
उ. सोलापूर : तालुक्यात सीना नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी गुरुवारी (ता. २५) कमी होण्यास सुरवात झाली आहे. मात्र, अद्यापही घरे व शेती पाण्याखालीच आहे. यामुळे पूरग्रस्तांचा मुक्काम तात्पुरत्या निवारा केंद्रामध्येच आहे. या पुराचा तालुक्यातील नदीकाठावरील पाच गावांसह नंदूर व डोणगाव या चार किलोमीटर लांब असणाऱ्या गावांनाही फटका बसला आहे.