
Floodwaters from the Sina River submerge fields and homes in Shivni, leaving farmers devastated.
Sakal
उ.सोलापूर : सीना नदीच्या महापुरामुळे काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कित्येक कुटुंबाचा संसारच या पुरात वाहून गेला. शिवणी येथील राजकुमार गुंड तर पाकणी येथील कमलाकर आवताडे या दोन्ही कुटुंबाचा अवघा संसारच पुरात वाहून गेल्याचे चित्र आहे. सीना नदीच्या पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांची काय दयनीय अवस्था झाली याची ही दोन उदाहरणे.