
Solapur Faces Unprecedented Flood Situation as Sina River Overflows
Esakal
मराठवाड्यात पावसानं हाहाकार उडाला असून धाराशिव, बीड, जालना जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. तर सोलापूरातही पावसाने हाहाकार उडालाय. माढा तालुक्यात सीना नदीच्या पाणी पातळीत अभूतपूर्व अशी वाढ झालीय. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच या नदीला महापूर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील सीना नदीत सध्या 2 लाख 12 हजार 651 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.