esakal | "पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार न्हाय !' फडणवीसांना जबरदस्त टोला

बोलून बातमी शोधा

Fadanvis

(सोमवारी) मंगळवेढा तालुक्‍यातील पोटनिवडणुकीच्या प्रचास सभेत बोलताना "सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा !' असे सत्ताबदलाचे संकेत देऊ पाहणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना एका गाण्याने जबरदस्त टोला हाणला आहे. 

"पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार न्हाय !' फडणवीसांना जबरदस्त टोला
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : काल (सोमवारी) मंगळवेढा तालुक्‍यातील पोटनिवडणुकीच्या प्रचास सभेत बोलताना "सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा !' असे सत्ताबदलाचे संकेत देऊ पाहणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना एका गाण्याने जबरदस्त टोला हाणला आहे. "हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार न्हाय !' अशा शब्दात महाराष्ट्रातील व मंगळवेढ्याचे मूळ रहिवासी असलेल्या प्रसिद्ध लोकगायकाने फडवीसांना प्रखर उत्तर दिलं आहे. 

गायक आनंद शिंदे यांनी हे गाणं म्हटलं असून, "हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार न्हाय !' असा इशारा आनंद शिंदेंनी दिला आहे. दिवंगत आमदार भारत भालके हे गायक आनंद शिंदे यांचे मित्र. त्यांच्या प्रेमासाठी आनंद शिंदे हे त्यांचे चिरंजीव आणि पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सोमवारी मंगळवेढ्यात आले होते. 

आनंद शिंदे यांच्या सभेच्या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेढ्यात सभा झाली होती. त्या सभेत फडणवीस यांनी "सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा !' असे वक्तव्य केले होते. तोच धागा पकडत गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता "त्यांना सांगायचंय मला' असे म्हणत फडणवीसांच्या वक्तव्याचा एका गाण्याच्या माध्यमातून समाचार घेतला. 

अशा आहेत गाण्याच्या ओळी...

तुम्ही चिडवताय, 
आम्ही चिडणार न्हाय ! 

तुम्ही लय काय करताय, 
तसं काय घडणार न्हाय ! 

तुम्ही रडवताय, 
पण आम्ही रडणार न्हाय ! 

हे पवार साहेबांचं सरकार हाय, 
तुमच्या बापाच्यानं पण पडणार न्हाय !
 

आनंद शिंदेंच्या या गाण्याने उपस्थितांनी जल्लोषात शिट्ट्या व टाळ्यांच्या कडकडाट केला. या वेळी धुरळा चित्रपटातील "नजर धारदार माणूस दमदार' हे गाणे गात शिंदे यांनी भगीरथ भालके यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. या वेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारही उपस्थित होते.