"अटल रॅंकिंग'मध्ये "सिंहगड'ची बाजी; उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मिळविले स्थान 

industry
industry

सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (केगाव) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय व अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या इनोव्हेशन सेलच्या क्रमवारीत स्थान पटकावले आहे. 

नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक, अखिल भारतीय तंत्रपरिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात देशातील यशस्वी महाविद्यालयांची यादी घोषित करण्यात आली. "अटल रॅंकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन ऍचिव्हमेंट्‌स' या क्रमवारीला 2019 पासून सुरवात झाली. त्यानुसार उद्योजकता विकासाला उत्तेजन देऊन विद्यार्थी व शिक्षकांचा त्यात सहभाग वाढविणाऱ्या महाविद्यालयांची निवड त्यातून केली जाते. या क्रमवारीत स्थान मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा असते. देशभरातून अनेक महाविद्यालयांचे अर्ज येतात. त्यामध्ये उद्योजकता विकासासाठी पूरक कार्यक्रमांचे आयोजन, बौद्धिक संपदा हक्क, नावीन्यतेवर राबवलेले उपक्रम, त्यासाठी झालेल्या जमा-खर्चाचा तपशील, इन्क्‍युबेशन सेंटरची उभारणी, स्टार्ट-अपला चालना, नवनव्या अभ्यासक्रमांचे आयोजन आदी बाबींची पडताळणी केली जाते. अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठे आणि खासगी विनाअनुदानित महाविद्यालये व विद्यापीठे अशा दोन विभागांतून ही क्रमवारी केली जाते. खासगी विनाअनुदानित महाविद्यालयाच्या वर्गवारीत "सी' श्रेणीत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश झाला आहे. 

याबाबत सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्‍टर संजय नवले म्हणाले, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणे व उद्योजक निर्माण करण्यासाठी "सिंहगड' नेहमीच प्रयत्नशील असते. संस्था चालक म्हणून उद्योजकतेला सहकार्य करण्यासाठी निधीची कमतरता पडू देत नाही. तसेच उद्योजकतेला पूरक वातावरण निर्माण करण्यावर संस्थेचा कायम भर असेल. 

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले म्हणाले, उद्योजकता वाढीला प्रोत्साहन व उत्तेजन हे महाविद्यालयाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. उद्योजकतेसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली आणि त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातून एकमेव सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश झाला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com