

Lakhs of devotees take a holy dip in the Chandrabhaga river during Kartiki Ekadashi celebrations in Pandharpur.
Sakal
-राजकुमार घाडगे
पंढरपूर : ‘अवघीची तीर्थे घडती एक वेळा... चंद्रभागा डोळा देखलिया... पंढरीचा वास... चंद्रभागे स्नान... आणिक दर्शन विठोबाचे... या संतोक्ती प्रमाणे कार्तिकी एकादशी दिवशी लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानाची पर्वणी साधली. सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे सहा लाख भाविकांमुळे अवघी पंढरी भक्तीरसात तल्लीन झाली होती. श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग तेरा नंबरच्या पत्रा शेडच्या पुढे गेली होती. श्री विठ्ठल दर्शनासाठी बारा ते तेरा तासांचा अवधी लागत होता.