Solpaur : चक्क स्कूटीमध्ये लपून बसला साप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solpaur : चक्क स्कूटीमध्ये लपून बसला साप
Solpaur : चक्क स्कूटीमध्ये लपून बसला साप

Solpaur : चक्क स्कूटीमध्ये लपून बसला साप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील कुमठा नाका भागात जज कॉलनीत एका स्कूटीमध्ये लपून बसलेल्या सापाची सुटका सर्पमित्रांनी केली. रविवारी (ता.२१) सकाळी ७ वाजता कुमठा नाका येथील न्यायाधीश कॉलनी मध्ये घडली. न्यायाधीश रेणुका गायकवाड यांच्या बंगल्यावर तैनात असलेले गार्ड पांडुरंग गोडसे यांनी एक साप दाराजवळच लावलेल्या स्कुटीच्या दिशेने जात असल्याचे पाहिले. त्यांना तो साप नागाचे पिल्लू असल्याचे भासले. पुढे जाऊन पाहिलं तर काय तो साप त्या स्कुटीमध्ये जाऊन लपल्याचे गोडसे यांनी पाहिले.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

साप गाडीमध्ये गेल्याचे पाहताच त्यांनी न्यायाधीश रेणुका गायकवाड यांना घटनेची माहिती दिली. न्या. गायकवाड यांनी स्कुटीची पाहणी केली परंतु साप खूपच अडचणीत जाऊन बसल्याने वरून दिसत नव्हता. तेव्हा त्यांनी सर्पमित्र राहुल शिंदे यांना घटनेची माहिती दिली. काही क्षणातच सर्पमित्र राहुल शिंदे यांनी सर्पमित्र अनिल अलदार यांच्यासोबत घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा: संयुक्त किसान मोर्च्याकडून PM मोदींना खुलं पत्र; केल्या सहा मागण्या

साप स्कुटीच्या आतील बाजूस जाऊन बसल्याने बऱ्याच प्रयत्नांनंतर ही तो दिसत नव्हता. शेवटी गाडी उघडण्याशिवाय दुसऱ्या पर्याय नसल्याने मेकॅनिक बोलवून स्कुटी उघडण्यात आली. स्कुटी उघडताच साप डिक्कीच्या खाली बसल्याचे दिसून आले. सर्पमित्र अनिल अलदार यांनी या सापास अलगदपणे बाहेर काढून बाटलीत कैद करताच सर्व उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हा साप नाग नसून बिनविषारी तस्कर साप असल्याचे राहुल शिंदे यांनी सांगितले.

हिवाळ्यात अनेक सर्प थंडीपासून बचावासाठी गाडीमध्ये प्रवेश करतात. सर्व नागरिकांनी सतर्क राहावे व सकाळी गाडी चालू केल्या नंतर थोडी रेस करावी जेणेकरून एखादा साप गाडीमध्ये बसला असल्यास गाडीच्या व्हायब्रेशनमुळे बाहेर पडेल असे त्यांनी सांगितले. या सापास त्याच्या नैसर्गिक अधिवासात त्वरित मुक्त करण्यात आले.

loading image
go to top