lampy disease
lampy disease esakal

Solapur : लम्पी आजाराने १९ जनावरांचा मृत्यू

माळशिरस तालुक्यात एक लाख १५ हजार जनावरांचे लसीकरण; पशुपालक चिंताग्रस्त

नातेपुते : माळशिरस तालुक्‍यात लम्पी आजाराने १९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. १५५ जनावरे लम्पी आजारातून बरे झाले आहेत. अद्यापही २१३ जनावरांना लम्पी आजार आहे, त्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. शहाजी ठवरे यांनी सकाळ ला दिली.तालुक्‍यात एकूण एक लाख वीस हजार जनावरांची संख्या असून आज आखेर १लाख १५ हजार जनावरांचे लसीकरण झालेले आहे.

lampy disease
Solapur :पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीतून ‘आयएफएस’ पदाला गवसणी

पशुसंवर्धन खात्यातील अधिकारी सर्व कर्मचारी लम्पी आजार आटोक्‍यात येण्यासाठी आणि लम्पी आजार झालेल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नशील आहेत. रविवारी सुद्धा जनावरांवर उपचार केले जात आहेत.सध्या २१३ जनावरांना लम्पी ची लागण झालेली आहे. त्यावरती उपचार सुरू आहेत. १९ दगावलेल्या जनावरा पैकी दोन जनावरांना शासकीय मदत मिळालेली आहे. बाकीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवलेले आहेत.

lampy disease
Solapur : शिंदे कारखाना युनिट दोनचा गळीत हंगाम शुभारंभ

मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेअंतर्गत माळशिरस आणि सांगोला तालुक्‍यासाठी एक अंबुलन्स मिळालेली असून वेळोवेळी शासनाकडून औषधाचा पुरवठा होत आहे.सध्या माळशिरस तालुक्‍यात सहाय्यक आयुक्त, १९ पशू विकास अधिकारी, तात्पुरते पशू विकास अधिकारी एक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ४, पशुधन पर्यवेक्षक १३, सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्‍त एक, तात्पुरते पशुधन पर्यवेक्षक दहा, परिचर १४ असे सर्व अधिकारी, कर्मचारी जनावरांवर उपचार करीत आहेत.

lampy disease
Solapur : चालू गळीत हंगामात ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्या शेतकरी संघटनांचा एल्गार

पशुपालकांनी आपल्या जनावरांना लम्पीचे लक्षणे दिसताच ताबडतोब शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून कळवावे. गोठ्यात येऊन उपचार केले जात आहेत.

- डॉ. शहाजी ठवरे, पशुधन विकास अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com