Solapur :पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीतून ‘आयएफएस’ पदाला गवसणी

दहा लाखांच्या नोकरीचा राजीनामा देवून मिळवले यश
Solapur news
Solapur newsesakal

जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही, जी मनुष्य साध्य करू शकत नाही. फक्त आपण जे काही ध्येय स्वतःसाठी पाहात आहोत ते साध्य करण्यासाठी निरंतर मेहनत आणि धैर्य, कठोर परिश्रम केले तर नक्कीच यश मिळते, हे कोल्हापूर जिल्ह्यातील धैर्यशील मानसिंग पाटील यांनी आपल्या यशातून सिद्ध केले आहे. ‘शिक्षकांचे कुटुंब’मधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले अन् स्पर्धा परीक्षा करण्यासाठी दहा लाख रुपये पॅकेजच्या नोकरीचा राजीनामा देऊन पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीतून ‘आयएफएस’ पदाला गवसणी घातली.

Solapur news
Solapur : चालू गळीत हंगामात ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्या शेतकरी संघटनांचा एल्गार

आयएफएस धैर्यशील पाटील त्यांच्या यशाबद्दल सांगतात की, आमचं कुटुंब मुळचे कोल्हापूरचे. परंतु वडील माध्यमिक शिक्षक असल्याने, वडिलांची या गावातून त्या गावात बदली होत असल्याने, बराचसा काळ हे वास्तव्य सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात होते. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेत असताना नेहमी नवीन शाळा ठरलेली असायची. त्यामुळे तेथील वातावरणाशी जुळवून घेताना कसरत व्हायची. शाळा जरी बदलत असली तरी शैक्षणिक गुणवत्ता मात्र चांगली होती, ही माझी जमेची बाजू होती. त्याचं कारण म्हणजे घरातूनच शिक्षणाचे बाळकडू मिळत होते. तसा आमच्या कुटुंबाला शैक्षणिक वारसा खूप मोठा. आजोबा शिक्षक, वडील शिक्षक, चुलते शिक्षक त्यामुळे आपण यांच्यापुढे जायचे, अशी इच्छा होती. त्यात कुटुंबीयांची इच्छा होती की, मी डॉक्टर व्हावे. त्यादृष्टीने वडिलांकडून मार्गदर्शन देखील मिळत होते.

Solapur news
Solapur : हिजाब बंदीबाबत विभाजित निकाल

बारावीचे शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी धावपळ सुरू झाली. वडील नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असल्याने, प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याचा अनेकवेळा योग आला. काही किरकोळ कागदपत्रांसाठी पंधरा दिवस हेलपाटे मारावे लागले. त्यावेळी प्रशासकीय यंत्रणेचे कार्य लक्षात आले. प्रशासकीय पदाबद्दल थोडे आकर्षण निर्माण झाले. बारावीमध्ये असताना मेडिकलला प्रवेश घेण्यासाठी असलेल्या परीक्षा दिल्या; परंतु काही अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे हातात चांगली एखादी पदवी असावी या हेतूने मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. डॉक्टरकीचा नाद सोडून इंजिनिअरिंगची वाट धरली. परंतु कष्ट करण्याची तयारी आई- वडिलांनी लहानपणापासून शिकवली होती. त्यामुळे ताटात पुढे जे वाढले आहे तेच खायचे, या विचारातून इंजिनिअरिंगचे शिक्षण अव्वल गुणांसह पूर्ण केले. विशेष म्हणजे, अनेकजण ज्या चांगल्या पॅकेजच्या नोकरीसाठी धावपळ करतात, ती नोकरी इंजिनिअरिंगचा शेवटचा निकाल हातात येण्याअगोदरच माझ्या हातात आली होती. २०१० मध्ये भारत पेट्रोलियममध्ये त्यावेळी जवळपास दहा लाखांचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली. आई- वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

Solapur news
Solapur : मोहोळमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने घातला धुमाकुळ

नोकरीचे ठिकाण हे दिल्ली असल्याने तेथे रुजू झालो. सर्व काही सुरळीत चालले होते. जीवनाच्या या टप्प्यावर चांगल्या पगाराची नोकरी असल्याने स्थिरावलो होतो. परंतु दररोज तेच तेच काम असल्याने, नोकरीत कंटाळा येऊ लागला. नवीन संकल्पना राबविण्यास पाहिजे तितकासा वाव मिळेना. लहानपणापासून वडिलांचं काम पाहिलेलं. जनमानसाची अडली-नडलेली कामे करण्याची वडिलांची प्रेरणा मिळालेली. त्यामुळे नवीन काहीतरी करावे, या संकल्पनेतून, प्रशासनाबद्दल असलेल्या आकर्षणातून व दिल्लीतील स्पर्धात्मक वातावरणामुळे स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. नोकरी करत यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. अभ्यासासाठी वेळ देऊ लागलो. काही खासगी क्लासेस सुरू केले, परंतु त्यांचे काही समजेना म्हणून ‘सेल्फ स्टडी’वर भर दिला. मनात प्रचंड आत्मविश्वास, कष्ट करण्याची तयारी ठेवून पूर्ण ताकदीने अभ्यास केला. यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिसबरोबर भारतीय वनसेवेची देखील परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याने, त्यापूर्वी वार्षिक दहा लाखांचे पॅकेज असलेल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. कुटुंबातील सदस्यांना नोकरी सोडण्याचा हा निर्णय धक्का देणारा होता. नामांकित कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून हा नेमका करणार काय, असा प्रश्न सर्वांना पडला होता.

Solapur news
Solapur : ‘लम्पी’साठी समन्वय अधिकारी नेमावेत

कोणत्याही प्रकारचा ताणतणाव न घेता आपण यशस्वी होऊ शकतो, हा आत्मविश्वास बाळगून परीक्षेस सामोरे गेलो अन् पहिल्याच प्रयत्नात भारतीय वनसेवा अधिकारी (आयएफएस) म्हणून निवड झाली व महाराष्ट्र केडर देखील मिळाले. महसूल, पोलिस प्रशासनाबद्दल आकर्षण असताना, वनसेवेत नोकरी करणे म्हणजे एक आव्हानात्मक काम होते‌. परंतु प्रशिक्षण घेऊन रुजू झाल्यानंतर वनसेवेत देखील उल्लेखनीय कामगिरी करण्याची संधी मिळाली. गोंदिया येथे सेवा बजावून सध्या सोलापुरात जिल्हा वन अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com