Solapur : सोलापुरात २४ वा टेक्सटाईल मशिनरी कॅटलॉग शो

इटम्मा व टेक्सटाईल डेव्हलपमेंट फौंडेशनचा उपक्रम
Textile Solapur
Textile SolapurSakal

सोलापूर : इंडियन टेक्स्टाईल अॅक्सेसरीज अॅण्ड मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( ITAMMA ) आणि टेक्सटाईल डेव्हलपमेंट फौंडेशन ( TDF ) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.७) देशातील २४ वा टेक्सटाईल मशिनरी कॅटलॉग शो हॉटेल बालाजी सरोवर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

इटम्माचे अध्यक्ष पुर्विक पांचाळ, खजिनदार भावेश पटेल, संचालक (तांत्रिक) एन.डी. म्हात्रे, टीडीएफचे अध्यक्ष श्रीनिवास बुरा, माजी अध्यक्ष सिध्देश्वर गड्डम, खजिनदार संजय मडूर आदींनी पत्रपरिषदेत गुरवारी ही माहिती दिली.

ईटम्मा ही देशपातळीवर काम करणारी संस्था देशातील विविध शहरात अशा प्रकारच्या कॅटलॉग शोचे आयोजन करते. टेक्सटाईल उद्योजकांना त्यांच्या यंत्रसामुग्रीसाठी हवे असलेले मार्गदर्शन, सुटे भाग व नविन यंत्र खरेदी यासाठी शोमधून मार्गदर्शन केले जाते. तसेच त्यांना थेट सुटे भाग व यंत्र निर्मात्या कंपन्याशीं थेट संवाद साधून त्यांच्या मागण्या व पुरवठ्याचे निर्णय घेणे शक्य होते. बदलत्या तंत्रज्ञानानुसार उद्योजकांच्या नव्या मागण्या देखील विचारात घेऊन यंत्रपुरवठा केला जातो.

सध्या देशाचे टेक्सटाईल उत्पादन हे १०० अब्ज डॉलर एवढे आहे. हे उत्पादन ३५० अब्ज डॉलरपर्यंत वाढावे यासाठी होत असलेल्या धोरणात्मक प्रयत्नाचा एक भाग म्हणून या उपक्रमाला मोठे महत्व आहे. या प्रदर्शनात ४० हून अधिक कंपन्या त्यांची उत्पादने आणि कॅटलॉग प्रदर्शित करतील.

स्पर्धात्मक किमतीत दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या हाय - टेक मशीनचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे . तीव्र स्पर्धेच्या जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या दर्जेदार मशिनरी, ॲक्सेसरीज आणि लोअर्स हे उपयोगी ठरणार आहेत. तसेच कमी देखभाल, कमी खर्चात त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास सहाय्यभूत होतील.

सोलापूरच्या वस्त्रोद्योगामध्ये अलीकडेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या बऱ्याच मशीनरी आल्या आहेत. येणाऱ्या काळात या आधुनिकीकरणाची गती आणखी वाढणार आहे. त्यामुळे त्यांना चांगल्या गुणवत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या मशीनची देखभाल करण्यासाठी चांगल्या सेवा देणाऱ्या पायाभूत सुविधांची आवश्यकता लक्षात घेत हा उपक्रम केला जात आहे. महाराष्ट्रात इचलकरंजी नंतर सोलापुरात हे राष्ट्रीय पातळीवर प्रदर्शन भरत आहे.

ईटम्मा बद्दल माहिती

( ITAMMA ) संबंधी थोडक्यात माहिती . ' इंडियन टैक्सटाईल अॅक्सेसरीज अॅड मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ही सर्वात मोठी आणि जुनी टेक्सटाईल इंजिनिअरिंग असोसिएशन आहे. या संस्थेला NABET द्वारे " डायमंड ग्रेड " ने " राष्ट्रीय स्तरावर मान्यता दिली आहे. या संस्थेला राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण जबाबदारी ' साठी सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार देखील मिळाला आहे. या संस्थेचे ४५० पेक्षा अधिक सदस्य टेक्सटाईल्स स्टोअर व मशिनरी डिरेक्टरीची निर्मिती करत टेक्सटाईल उद्योगाला मदत करतात. कॅटलॉग शो , मशिनरी प्रदर्शन , सेमिनार , कार्यशाळा आदी संवादाचे उपक्रम राबवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com