Solapur : शिराळा तालुक्‍याच्‍या पश्चिमेत वैरणीचा तुटवडा

गवत काढणीला गती : चाऱ्याचा प्रश्‍‍न गंभीर ; पेरणीत ५० टक्के घट
Solapur
Solapuresakal

पुनवत : शिराळा तालुक्यात चालू वर्षी पाऊसकाळ कमी झाल्याने डोंगरमाथ्यावरील गवत वेळेआधीच वाळले आहे. शिवाय वैरणीचा तुटवडा भासत असल्याने पश्चिम भागातील मेणी खोऱ्यात गवत काढणीला गती आल्याचे चित्र आहे.

Solapur
Career Tips : बारावी नंतर ऑफबीट करिअर करायचे आहे? मग, 'या' कोर्सची करा निवड

ऊसतोडी सुरू झाल्यानंतर वैरणीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र म्हणावी तशी वैरण उपलब्ध होत नसल्याने गवताची कापणी वेळेआधीच सुरू केली आहे. पाऊसकाळ कमी झाल्याने चालू उसाची वाढही म्हणावी, अशी झालेली नाही. क्षेत्र कमी असल्याने दोन महिनेच हंगाम चालेल, अशी अवस्था आहे. चालू वर्षी वैरणीचा तुटवडा भासणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गवताला महत्त्व येणार आहे. गतवर्षीपेक्षा गवताच्या पेंढीत दरवाढ होणार असल्याचे जाणकारांतून बोलले जात आहे.

Solapur
Hygiene Tips For Women : प्रत्येक महिलेला शारीरिक स्वच्छतेच्या या गोष्टी माहिती असायलाच हव्यात!

गवतवाढीच्या वेळेतच पावसाने दडी मारल्याने म्हणावी अशी वाढ झालेली नसली तरीही आहे ते गवत पदरात पाडण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागणार आहे. तरच चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रब्बी हंगामातील पिकाची वैरण मिळायची. मात्र पाण्याअभावी ५० टक्केही पेरणी झालेली नाही. ऊस लागवड क्षेत्रातही घट होत आहे. त्यामुळे गवताला पुन्हा चांगले दिवस येणार आहेत. या वर्षी गवताची वाढ झाली नसली तरीही कापणी योग्य आहे. उसाची कमी उगवण झाल्याने चारा व गवताचा भाव वाढणार आहे.

काढणी, मजुरीत वाढ

चालू वर्षी गवत काढणी, मजुरीचे दर वाढले असून ३०० रुपये व २० ते २५ पेंढ्या गवत असा आहे. दर वाढूनही मजूर मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात अनेक दिवसांपासून पावसाचे वातावरण होत आहे. मात्र पाऊस काही पडलेला नाही. परिणामी चालू वर्षी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com