सोलापूर - उपरी परिसरात बिबट्यासदृश प्राणी आढळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur
सोलापूर - बिबट्यासदृश्य प्राणी आढळला

सोलापूर - उपरी परिसरात बिबट्यासदृश प्राणी आढळला

सोलापूर : उपरी येथे उजनी उजवा कालव्याच्या पळशी बोगद्याजवळ सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

येथील जेसीबीचालक संतोष नागणे हे जेसीबीचे काम करत होते. तेव्हा उपरी, गादेगाव सीमेवर त्यांना बिबट्यासदृश प्राणी आढळला. त्यांनी जवळच्या काही लोकांना ही माहिती दिली. तसेच त्याचा व्हिडिओही तयार करून व्हायरल केला. थोड्याच वेळात ही माहिती गावात आणि परिसरात वाऱ्यासारखी पसरली. तेव्हा एकच चर्चा सुरू झाली.

हेही वाचा: मुंबई : कांदिवली येथील चारकोप परीसरात पंधरावड्या पासून पिण्याच्या पाण्याला दुर्घंधी

त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही ठिकाणी शोध घेतला. पण अंधारामुळे ठसे मिळू शकले नाहीत, सकाळी पुन्हा शोध सुरू झाला आहे. पण रात्री वा त्याआधीही या भागात या प्राण्याने कोणावरही हल्ला केल्याची घटना घडली नाही. तरीही ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

loading image
go to top