Solapur News: 'सोलापुरात ९३ टक्के गुरुजींनी दिली ‘टीईटी’; आईची परीक्षा अन्‌ चिमुकले बाबांकडे, सीईओ कुलदीप जंगम यांनी दिली भेट..

Solapur TET exam: परीक्षा केंद्रांवर काही हृदयस्पर्शी दृश्येही पाहायला मिळाली. अनेक महिला परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या, ज्यांच्यासोबत चिमुकले आले होते. आई परीक्षा देत असताना लहान मुले बाबांकडे सुरक्षित राहिल्याचे दृश्य उपस्थितांच्या नजरा खिळवून गेले.
TET examinees in Solapur, including mothers appearing for the test while children waited with their fathers.

TET examinees in Solapur, including mothers appearing for the test while children waited with their fathers.

Sakal

Updated on

सोलापूर : एरवी विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून काटेकोरपणे नियोजन करणाऱ्या शिक्षकांचीच आज परीक्षा होती. परिक्षा देणारे शिक्षकच असले तरीही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह, आर्टिफिशियल इंटिलिजिन्सच्या मदतीने काटेकोर व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज सोलापुरातील ३४ उपकेंद्रावर महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महा-टीईटी) परीक्षा झाली. परिक्षेसाठी नोंदणी केलेल्या ९३ टक्के जणांनी ही परिक्षा दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com