
सोलापूर: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने यंदा सोलापूर शहर-ग्रामीण पोलिस दलातील सात जणांसह राज्य राखीव पोलिस बल क्र. दहा आणि केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथील प्रत्येक एका अंमलदारास राज्य सरकारकडून विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. सोलापूर शहर पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला असून, सोलापूर शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त राजन माने यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.