

Court resumes hearing in Solapur advocate Rajesh Kamble murder case as two key witnesses record vital statements.
Sakal
सोलापूर: येथील ॲड. राजेश श्रीमंत कांबळे (वय ४५, रा. ब्रह्मचैतन्यनगर, नवीन आरटीओ कार्यालयाजवळ, सोलापूर) यांचा खून झाला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी संजय ऊर्फ बंटी महादेव खरटमल, ॲड. सुरेश चव्हाण व श्रीनिवास येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी सुरू आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्यासमोर बुधवारी (ता. १९) दोन साक्षीदारांच्या महत्त्वाची साक्ष झाली.