Solapur Air Service : विमानसेवेची मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडील बैठक रद्द

सोलापूरच्या विमानसेवेचा निर्णय पुन्हा 'हवे'त !
Solapur Air Service Meeting with Civil Aviation Chief Secretary Manukumar Srivastava cancelled solapur
Solapur Air Service Meeting with Civil Aviation Chief Secretary Manukumar Srivastava cancelled solapurसकाळ

सोलापूर : सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव म्हणून मनुकुमार श्रीवास्तव आज शुक्रवार 9 डिसेंबर रोजी बोलवण्यात आलेली बैठक रद्द झाली, याने कोल्हापूरच्या विमानसेवी संदर्भातल्या आजच्या बैठकी संदर्भातल्या गप्पा 'हवे'तच विरल्या. इथल्या विमानसेवेची तांगडे कायम राहिले. सोलापूरची विमान सेवा सुरू करण्यासाठी तसेच सिद्धेश्वर कारखान्याने बांधलेली बेकायदेशीर चिमणी आणि इतर अडथळ्याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी शुक्रवारी दोन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक बोलावली होती मात्र ही बैठक रद्द झाली. येत्या १४ डिसेंबर रोजी पुन्हा याच विषयावर बैठक होणार आहे त्यामुळे या बैठकीमध्ये नक्की सोलापूरच्या विमानसेवा संदर्भात योग्य तो चांगला निर्णय लागेल अशी माहिती सिद्धेश्वर कारखान्याचे माजी तज्ञ संचालक संजय थोबडे यांनी दिली.

डीजीसीए, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, सोलापूर महापालिका जिल्हाधिकार्यालय तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एनवोर्मेंटल डिपार्टमेंट यांची संयुक्त बैठक घेण्याबाबत मी यापूर्वी वारंवार पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रव्यवहार केला तसेच हायकोर्ट आणि एनजीटी मध्ये देखील केसेस दाखल केले आहेत. महापालिकेने चिमणी संदर्भात त्वरित निकाल द्यावा तसेच डीजीसीए यांनी देखील आपला निकाल द्यावा अशी मी मागणी केली आहे यासाठी मी सोमवार दिनांक 12 डिसेंबर रोजी महापालिकेसमोर हलगी नाद आंदोलन देखील करत आहे.

येत्या 14 डिसेंबर रोजी पुन्हा वरील सर्व अधिकाऱ्यांसमवेत राज्याचे मुख्य स्वच्छ स्वतः आढावा घेऊन निर्णय देणार आहेत. त्यामुळे सोलापूरकरांनी सिद्धेश्वर कारखान्याच्या भूलथापांना तसेच खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांना बळी पडू नये. असे आवाहन संजय थोबडे यांनी केले आहे. सोलापूरची विमान सेवा सुरू होईपर्यंत गप्प बसणार नाही . सोलापूरकरांनी बेकायदेशीर वागणाऱ्या धर्मराज काडादी सारख्या व्यक्तींना पाठीशी घालू नये. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे. कागदोपत्री आणि न्यायालयीन लढाईमध्ये हरल्यामुळे काढावी आता लोकांना भडकविण्याची भाषा करत आहेत त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन देखील थोबडे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com