Solapur : सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यात विखे-पाटील नापास; चंद्रकांत पाटलांची परीक्षा

सोलापूरची विमानसेवा : भाजपचे नेते जिल्ह्यातच फोडताहेत डरकाळ्या
solapur air service vikhe patil fail now chandrakant patil take over politics
solapur air service vikhe patil fail now chandrakant patil take over politicssakal

सोलापूर : सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यात विखे-पाटील नापास झाले. सोलापूरच्या अवघड विमानसेवेचा पेपर आता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर आहे. हा पेपर वेळेत सोडविण्याची परीक्षा आता चंद्रकांत पाटील यांना द्यावी लागणार आहे.

राज्य सरकारमध्ये सोलापूरला मंत्रिपदाचा ठेंगा मिळाल्याने विमानसेवेसह इतर विकास कामांसाठी सोलापूर जिल्ह्याला उपऱ्या पालकमंत्र्यांवर पहिल्यांदा विसंबून राहावे लागत आहे. मी तात्पुरता पालकमंत्री आहे म्हणून राधाकृष्ण विखे-पाटलांनी एक वर्ष दहा दिवस सोलापूरचे पालकमंत्री म्हणून काम केले.

होटगीरोड विमानतळाची कामे पूर्ण होण्यास किमान सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे, हे जवळपास आता स्पष्ट झाले आहे. जूनमध्ये ही कामे पूर्ण झाल्यास नागरिक उड्डयन महानिदेशालयाकडून (डीजीसीए) विमानतळाचे परिक्षण,

विमानसेवेचा परवाना, विमानसेवा देण्यास विमान कंपन्या तयार करणे आणि सोलापूरकरांना विमानसेवेची सोयीची वेळ व ठिकाण (मुंबई/पुणे) ही कामे किमान ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२४ पर्यंत (विधानसभा मतदानापूर्वी) मार्गी लागावीत एवढीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

सोलापूर जिल्ह्यात भाजपचे दोन खासदार व सात आमदार आहेत. सोलापूरची विमानसेवा सुरू व्हावी यासाठी फक्त जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतच भाजपचे लोकप्रतिनिधी आवाज उठविताना दिसत आहे. सोलापूरच्या विमानसेवेसाठी मुंबई व दिल्ली दरबारी भाजपची ताकद उपयोगात आणण्याची आवश्‍यकता आहे. मात्र भाजपचे नेते केवळ भाषणातच याबाबत मोठणोठ्याने बोलत आहेत.

माळढोक न पाहताच विखे गेले

माजी पालकमंत्री विखे-पाटील यांच्यासमोर सोलापूरच्या विमानसेवेचा विषय निघाल्यास बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय हमखास निघत असे. बोरामणी विमानतळाला माळढोकचा अडथळा आहे.

तुम्ही माळढोक पाहिला का?, असा प्रश्‍न विचारण्यातच माजी पालकमंत्री विखे-पाटील यांचा सोलापूरच्या पालकमंत्रिपदाचा कालावधी संपला. माळढोक कोणी पाहिला? हे जाणून घेण्यापूर्वीच विखे-पाटलांकडून सोलापूरची जबाबदारी निघाली आहे. आताचे पालकमंत्री सोलापूरच्या विमानसेवेबाबत नक्की काय पाहणार? या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

चार वर्षांपूर्वी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील हॉलमध्ये टॉवेल, चादरचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यासाठी जगातील विविध देशातील व्यवसायिकांना आमंत्रित करण्यात आले होते.

फक्त विमानसेवा नसल्याने ६० टक्के व्यापारी या प्रदर्शनाला येऊ शकले नाही. अत्यंत खेदाची बाब आहे. कार्गो विमानतळ हे देखील गरजेचे आहे. कारण जगातील विविध देशातून मागणी वाढत आहे. तत्पर सेवा ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी विमानसेवा सुरू झालेच पाहिजे.

- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, यंत्रमानधारक संघ सोलापूर

बोरामणीचा आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे हे उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अधिक आवश्यक आहे. आज सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून सहा महिने झाले, मोठे नुकसान झाले. मनपा स्वतःची परिवहन व्यवस्था सुधारू शकत नाही,

तिथे विमानतळाचा प्रश्न लांबच. मोजक्या लोकांसाठी विमानसेवा सुरू केली तरीही याचा सोलापूरच्या उद्योग व्यवसायावर खूप मोठा परिणाम होईल, असे मला वाटत नाही. आमची भूमिका ठाम आहे. सोलापूरच्या उद्योग व्यवसायाच्या ऊर्जितावस्थेसाठी बोरामणीचा विमानतळ ताबडतोब सुरू करणे आवश्यक आहे.

- नरसय्या आडम, माजी आमदार, सोलापूर

गारमेंटचे जे उत्पादन तयार होते ते मोठ्या शहरात पाठवावे लागते. तेथील उद्योजकांना आमच्याकडे येऊन माल खरेदी करण्यासाठी वाहतूक व्यवस्था सोईस्कर नाही, खूप वेळ व पैसा जातो.

जर विमानसेवा आपल्याकडे सुरू झाली नाही तर, जगापासून आपण खूप मागे राहणार यात शंका नाही. सोलापुरात विमानसेवा नसल्याने आम्ही वाराणसीत जे प्रदर्शन भरवले तिथे पोहोचण्यास ३० तास लागले ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

- प्रकाश पवार, सचिव, श्री सोलापूर गारमेंट उत्पादक संघ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com