

Flights Take Off, But Police Station at Solapur Airport Still Grounded Pending Decision
Sakal
सोलापूर: सोलापूर विमानतळावरून आता गोवा आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. विमानतळ सुरू झाल्याने मंत्र्यांचे दौरे वाढले आहेत. दररोज विमाने ये-जा करतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानतळावर पोलिसांचे पुरेसे मनुष्यबळ कायमचे लागणार आहे. त्याअनुषंगाने, अतिरिक्त ७० पोलिस अंमलदार द्यावेत आणि विमानतळ परिसरात नव्या पोलिस ठाण्यासही परवानगी शहर पोलिसांनी मागितली आहे. तसा प्रस्ताव देऊनही अद्याप गृह विभागाकडून कोणताही निर्णय झालेला नाही.