Solapur : अरण्यऋषींच्या सोलापुरात राज्यातील पहिली निसर्ग शाळा

निसर्गप्रेमींच्या आशा पल्लवीत, नवी पिढी निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न
शाळा
शाळाsakal

सोलापूर : अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली यांच्या सोलापुरात राज्यातील पहिली निसर्ग शाळा प्रकल्प येथील सिद्धेश्वर वनविहारात उभारण्याच्या दृष्टीने तयारी सुरु झाली आहे.राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात पुढाकार घेतला आहे. सोलापुरात साधारण ५०० एकरावर निसर्गशाळा उभारण्यासाठी हालचाली वाढल्याने येथील निसर्गप्रेमींच्या आशा पल्लवित झाला असून निसर्गशाळेच्या माध्यमातून नव्या पिढीला निसर्गाशी जोडण्याचा परिणामकारक प्रयत्न यातून होणार आहे.

सिद्धेश्वर वनविहारात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत वेगळे वनउद्यान विकसित केले जावे. या दाट वनउद्यानात निसर्गशाळा उभारून पुढील पिढीला निसर्गाशी जोडण्याचे काम व्हावे, अशी भूमिका निसर्गप्रेमींनी मांडली. कारण केवळ जुन्या पिढीला निसर्गाचे महत्त्व सांगून उपयोग नाही तर पुढील पिढीपर्यंत निसर्गाचे महत्त्व समाजावून सांगितले, तरच पुढील काळात निसर्गसंवर्धनाची दिशा बळकट होऊ शकेल अशी भूमिका मांडली गेली.

पूर्वीच्या काळी दाट जंगलात ज्याप्रमाणे नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून निसर्ग सानिध्यात गुरुकुल चालवले जात असत. त्याप्रमाणे वनविहाराचा काही भाग हरित लागवड करुन तेथे मुलांना दर आठवड्याला निसर्गशाळेचा आनंद घेता यावा असा प्रयत्न केला जाणार आहे. वनपर्यटनाप्रमाणे पुढील पिढीसाठी निसर्ग शाळा मोठे योगदान देऊ शकते हा भविष्याचा दृष्टिकोन मांडला गेला. वनमंत्र्यांनी तत्काळ होकार दर्शवत प्रस्ताव तयार करण्याची सूचना दिली आहे.

सोलापुरात मुलांना निसर्गाचे शिक्षण मिळावे यासाठी ५०० एकरात निसर्ग शाळा उभारणीचा हा पहिलाच प्रकल्प राज्यात उभारण्याचा सन्मान सोलापूरकरांना मिळणार आहे. वन उद्यान होताना तेथील जैवविविधता याचे संरक्षण कसे करता येईल याचा विचार करावा तेथे प्राण्यांना पक्षांना पाणी पिण्यासाठी छोटेसे तलाव तसेच बॉटनिकल गार्डन वनौषधी शेती प्रकल्प तसेच एक निसर्गाची शाळा विद्यार्थी ना निसर्गातले धडे शिकवण्यात यावे यासाठी आठवड्यातून किंवा नियोजन प्रमाणे तेथे विद्यार्थ्यांना निसर्ग संरक्षण पर्यावरण संरक्षण याबद्दल प्रशिक्षण देण्यात यावे जेणेकरून पुढच्या पिढीसाठी आपला पर्यावरणाचा समतोल नक्कीच साधता येईल.

मुलांना निसर्गशाळेत मिळावे निसर्गाचे शिक्षण

मुलांमध्ये निसर्गाचे महत्त्व रुजवणारे कार्यक्रम

हरित सेनेची होणार मदत

इको हाऊसची उभारणी

विद्यार्थ्यांना थेट निसर्ग समजून घेण्याची संधी

सिद्धेश्वर वनविहारातील एका मोठ्या भागात जिल्हाभरातील विद्यार्थ्यांना थेट निसर्गाच्या सानिध्यात जाऊन प्रत्यक्ष निसर्ग समजावून घेण्याची संधी मिळाली तर नवी पिढी निसर्गाशी जोडून ठेवणे शक्य होणार आहे. हा दृष्टिकोन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समोर ठेवून प्रस्ताव मागविला आहे.

- डॉ.मनोज देवकर, संस्थापक, इको नेचर क्लब, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com