
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळेतून १९९७ रोजी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले बब्रुवान सदाशिव गायकवाड (वय ८४, रा. हनुमान नगर, सोलापूर) हे पेन्शनचे पैसे काढायला बाळीवेस येथे गेले होते. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमधून पैसे काढताना तेथील अनोळखी तरुणाने कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर त्याने खात्यातील ६० हजार रुपये लंपास केले.