Solapur : सामूहिक अत्याचारप्रकरणी पाच दिवसांची पोलिस कोठडी

आरोपीची सात दिवस पोलिस कोठडीची मागणी केली
crime
crimeesakal

सोलापूर : सामूहिक अत्याचारप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी संशयित आरोपी विष्णू गुलाब उर्फ चंद्रकांत बरगंडे (वय ४७, धंदा- नोकरी, रा. शिवाई निवास, औसे वस्ती, आमराई, सोलापूर) यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले.

तपास अधिकाऱ्यांनी आरोपीची सात दिवस पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने सरकारी वकील, तपास अधिकारी व आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जयश्री काकडे यांनी आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

आरोपी विष्णू बरगंडे व मुख्य आरोपी गणेश कैलास नरळे यांनी संगनमत करून फिर्यादीस ३१ ऑक्टोंबर २०२१ रोजी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, तिची बदनामी करण्याची धमकी देऊन पुणे येथे फिर्यादीची इच्छा नसताना देखील तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची फिर्याद गणेश कैलास नरळे व विष्णू बरगंडे यांचेविरुद्ध दाखल झाली होती.

फौजदार चावडी पोलिसांनी गणेश कैलास नरळे यास अटक केली होती. यात मूळ फिर्यादीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीपाद देशक तर सरकारतर्फे ॲड. आसावरी जोशी तर आरोपी तर्फे ॲड. महिंद्रकर यांनी काम पाहिले.

पोलिस अधीक्षकांकडे तपास

फौजदार चावडी पोलिसांनी गणेश कैलास नरळे याचे विरुद्ध भादवि कलम ४१७ अंतर्गत दोषारोपपत्र पाठवून आरोपी विष्णू बरगंडे यास गुन्ह्यातून वगळण्याचा अहवाल न्यायालयात दाखल केला होता. फिर्यादीने या अहवालाविरुद्ध व प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास व्हावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

फिर्यादीच्या याचिकेची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ केडर आयपीएस अधिकाऱ्याने करावा असे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिस महासंचालकांनी हा गुन्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याकडे वर्ग केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com