Solapur : आला हिवाळा! सर्दी, ताप, खोकल्याचे आजार टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवाळा

Solapur : आला हिवाळा! सर्दी, ताप, खोकल्याचे आजार टाळा

सोलापूर : हिवाळ्यात थंडीपासून होणारे आजार अर्थात खोकला, सर्दी व ताप आदी विकार वाढू लागतात. अनेकवेळा त्यासाठी प्रदीर्घ काळ औषधोपचार घ्यावा लागतो. त्यापेक्षा हिवाळ्याच्या प्रारंभी योग्य काळजी घेतल्यास सध्याच्या काळात अधिक धोकादायक ठरू शकणारा सर्दी, ताप, खोकल्याचा आजारही टाळता येणे शक्य होऊ शकते.

वातावरणातील बदलामुळे पाऊस बराच लांबला होता. आता ऑक्टोबर महिना संपताच शहर परिसराला थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. त्यात अद्यापही कोरोनाची दहशत सुरूच आहे. अशा परिस्थितीत कोणालाही ताप, खोकला, सर्दी होणे ही संपूर्ण कुटुंबासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे सध्या तरी त्यातील कोणताच आजार कोणाला होऊ नये यासाठी योग्य काळजी आणि दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. सर्दी झाल्यास सतत त्रास होत राहतो. परंतु सर्दीचा त्रास काही दिवसांत बरा होतो.

तो जास्तीत जास्त दहा दिवस राहतो. ॲलर्जीचा त्रास काही आठवडे किंवा कधीकधी एक-दोन महिनेही असू शकतो. तो त्रास हवेतील प्रदूषणामुळे झालेला असतो. थंडीच्या दिवसांत आजारांपासून आपले संरक्षण करण्यासाठी त्वचा कोरडी पडण्यापासून बचाव करणे आवश्यक आहे. त्यासाठी छोटे आणि साधे उपाय आपल्यासाठी उपयुक्त ठरतात. वातावरणातील बदलामुळे थंडीचा प्रभाव सर्वात आधी तो आपल्या त्वचेवर म्हणजे त्वचा कोरडी पडणे, ओठ फाटणे, त्वचा लाल होणे अशा विविध गोष्टी सुरू होतात. या सर्वांवर वेळीच उपचार केले नाहीत तर त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते.