“Final ward structure of Solapur to be declared today — civic and political circles closely monitoring developments.”
Sakal
सोलापूर
Solapur Municipal Corporation: 'प्रभाग रचनेतील बदलांकडे सोलापूरकरांचे लक्ष'; महापालिकेची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर होणार..
Changes in Solapur Ward Boundaries Expected: महापालिका संकेतस्थळ आणि कौन्सिल हॉल सभागृहाशेजारी ही अंतिम प्रभाग रचना नागरिकांना पाहता येणार आहे. महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना ३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर ३८ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या.
सोलापूर: सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना उद्या (सोमवार, ता. १३) सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. यामुळे आता सर्वांचे लक्ष राज्य निवडणूक आयोगाकडे लागले आहे. अंतिम प्रभाग रचनेत कोणते बदल होणार? कोणते प्रभाग कायम राहतील? कोणत्या प्रभागामध्ये राजकीय समीकरणे बदलणार? यावर शहरातील आगामी निवडणुकीचे चित्र अवलंबून असेल.

