
सोलापुरात एका खासगी बँकेचे हफ्ते थकवल्यानं कर्जदाराच्या मुलालाच डांबून घातल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी सोलापुरात तिघांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. १ फेब्रुवारीला एका तरुणाचं अपहऱण झाल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती. याचा तपास केल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला. चार चाकी गाडीवर कर्ज घेतले होते. त्याचे हफ्ते थकवल्यानं वाहनासह कर्जदाराच्या मुलालासुद्धा उचलून नेण्यात आलं. सोलापूरमध्ये जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय.