election
electionsakal

बार्शी वकील संघाची निवडणूक जाहीर

१३ डिसेंबर रोजी निवडणूक

बार्शी : बार्शी वकील संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १३ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲड.विकास जाधव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ॲड.सुनील कुलकर्णी,×ॲड शंकर ननवरे यांनी दिली.

बार्शी वकील संघामध्ये ५१३ सदस्य संख्या आहे. मतदार यादी प्रसिद्ध झालेली असून शनिवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली आहे.२ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत असून उमेदवारी अर्जाची छाननी ३ डिसेंबर रोजी आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ डिसेंबरपर्यंत आहे १३ डिसेंबर रोजी मतदान व मतमोजणी व त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात यईल असे ॲड.जाधव यांनी सांगितले.
कोरोना महामारीमुळे दोन वर्ष निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या.

election
नवा व्हेरियंट, कृषी कायदे! PM मोदी करणार उद्या देशाला संबोधित

त्यामुळे मावळते अध्यक्ष ॲड.काकासाहेब गुंड व उपाध्यक्ष ॲड.रत्नमाला पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना मुदत वाढवून मिळालेली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सूचनेनुसार निवडणुका घेण्यात येत आहेत. बार्शी वकील संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, लायब्ररी चेअरमन व मॅनेजमेंट कमिटी सदस्य चार पदाधिकारी निवडीकरिता हा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com