esakal | Solapur: सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे होणार पंचनामे
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार राजेंद्र राऊत

बार्शी : सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे होणार पंचनामे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बार्शी(सोलापूर) : बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यात सरासरीपेक्षा दीड पट पाऊस झाला असून सोयाबीन, उडीद, कांदा पीकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल, कृषी, पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तहसील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सुनील शेरखाने, गटविकास अधिकारी शेखर सावंत, कृषी अधिकारी शहाजी कदम, सभापती अनील डिसले उपस्थित होते.

हेही वाचा: मनोहर भोसलेला पुन्हा चार दिवसांची कोठडी

आमदार राऊत म्हणाले की, प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्यासह बुधवारी चार ते पाच गावांचा दौरा केला असून वैयक्तिक ३१ गावात स्वतः पहाणी करुन माहिती घेतली आहे. अत्यंत वाईट परिस्थिती असून चांदणी नदीचे पाणी तर सहा ते सात फुट उंचीवरुन वाहत होते. त्यामुळे अनेकांच्या शेतात पाणीच-पाणी झाले आहे. तहसीलदा, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून पीक विम्यासाठी ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन अर्ज केले जाणार आहेत. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले असल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले.

loading image
go to top