Solapur Truck-Car Accident
esakal
सोलापूरात ट्रक आणि कारच्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. रविवारी रात्री बार्शी-लातूर महामार्गावर ही घटना घडली. कारमधील प्रवाशी तुळजापूरला देवदर्शनासाठी जात होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. या अपघातातील सर्व मृत रहिवासी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी गावाचे रहिवासी आहेत.