Solapur : ‘भीमा’ आता भीमराव महाडिक साखर कारखाना

खासदार महाडिक : सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न
solapur
solapursakal

मोहोळ - टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत ‘कै. पैलवान भीमराव (दादा) महाडिक सहकारी साखर कारखाना’ असे नामकरण करण्याचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाला असून, कारखान्याच्या सभेत काय ठराव झालेत, याची प्रत दिवंगत सभासद व कर्मचाऱ्यांच्या घरी पोचविली पाहिजे, ही प्रथा सुरू करावी, अशी सूचना कारखान्याला दिली असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

खासदार महाडिक म्हणाले, सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे. वरचेवर निसर्गाची अवकृपा हे ही त्याला महत्त्वाचे कारण आहे. साखर कारखान्यांना पूर्वीप्रमाणे आता उसापासून फक्त साखर उत्पादित करून चालणार नाही, तर विविध उपपदार्थ निर्मितीवर भर दिला तरच भविष्यात साखर कारखानदारी टिकणार आहे.

सर्वांचे दर वाढले आहेत, त्या पार्श्वभूमीवर काही बदल होणे गरजेचे आहे. मी केंद्र शासनाच्या सहकार विभागाकडे काही मागण्या करणार आहे. त्या मागण्या मान्य झाल्या तर साखर कारखाने व शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

solapur
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

खासदार महाडिक पुढे म्हणाले, सोलापूरची विमानसेवा लवकर सुरू करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. ती सेवा सुरू झाली तर दळणवळण वाढणार आहे व व्यापाऱ्यांचाही फायदा होणार आहे.

अशा आहेत मागण्या

सध्या साखरेची एमएसपी तीन हजार १०० रुपये आहे ती तीन हजार ६०० करावी

मिठाई व अन्य पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या साखरेचा दर ४५ रुपये प्रतिकिलो करावा.

इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा, त्यासाठी राज्य शासनाने पाच रुपये अनुदान द्यावे.

सहवीज निर्मिती प्रकल्पातून तयार झालेल्या विजेचा दर सात रुपये प्रतियुनिट करावा.

उसाचा पीक विम्यात समावेश करावा

घेतलेल्या पीक व शेतीपूरक कर्जाचे पुनर्गठन करून त्याच्या फेडीची मुदत दोन वर्षे करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com