Solapur : ‘भीमा’ची निवडणूक निर्णयाक टप्पावर; महाडिक, पाटील अन् परिचारकांची प्रतिष्ठापणाला

‘भीमा’ कारखाना सत्तासंघर्षाच्या महासंग्रामात कौल कोणाला ?‘आ देखे जरा किसमें कितना है’
Solapur
Solapursakal

सोलापूर : विविध मुद्यांवरुन अत्यंत ‘लक्ष्य’वेधी आणि बहूचर्चीत मोहोळ तालुक्यातील टाकळी सिंकदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता निर्णयाक टप्यावर आली असून येथील सत्तासंघर्षाच्या महासंग्रामात शेतकारी सभासदांचा कौल कोणाला? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांची राजकीय प्रतिष्ठापणाला लागली आहे.शिवाय त्यांच्या राजकीय अस्त्विाची दिव्य परीक्षादेखील होत आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने, मोहोळ, पंढरपूर आणि मंगळवेढा या तालुक्यात आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे यांच्या फुटत असलेल्या उखळी बॉम्बने निवडणुकीचा आखाडा प्रचंड तापला आहे. तीन तालुक्यातील शेतकरी सभासद आणि कामगार यांच्या हिताच्या दृष्टीने भीमा कारखान्याचे सिंहासन कोणाच्या ताब्यात द्यायचे, सत्ताधरी महाडिक गटाच्या ताब्यात पुन्हा कारखाना द्यायचा की भाकरी फिरवायची? यासंबंधीचा फैसला 19 हजार 48 सुज्ञ मतदारांकडून येत्या रविवारी होणार आहे.

भीमा साखर कारखान्याचे पर्यायाने शेतकरी सभासद आणि कामगारांचे आम्हीच कसे कनवाळू आहोत, या कारखान्याचे आम्हीच कसे हित साधू शकतो? या संदर्भात प्रचारसभा, वैयक्तीक गाठीभेटी याव्दारे महाडिक आणि पाटील - परिचारक गटाने मतदारांना सांगण्याचा अट्टाहास केला. पण शेतकरी सभासद राजानी भीमा कारखान्याच्या सत्तेच्या सिंहासनाचा केलेला विचार मतदान पेटीतून दिसून येणार आहे.

या कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला गेला. प्रचारादरम्यान या कारखान्याच्या हितासंदर्भात सभासदांसमोर जाताना महाडिक व पाटील-परिचारक यांनी दोन्ही गटांनी टिकेचे तोफगोळे फोडले.आरोप-प्रत्यारोपांनी एकमेकांना अक्षरश: घायाळ केले. बघून घेण्याची भाषादेखील वापरली गेली. सत्तासंघर्षाच्या लागलेल्या घनघोर लढाईत महाडिक तसेच पाटील व परिचारक यांची प्रतिष्ठपणाला लागल्याचे चित्र राहिले. दोन्ही गटांच्या अस्त्विाच्या लढाईसाठी जंग जंग पछाडने झाले. ‘फार्ईट टू फाईट’ रंगलेल्या सामन्यात दोन्ही गटांच्या राजकारणाचे अनेक कांगोरे समोर आले.या कारखान्याच्या सत्तासंघर्षात प्रचाराच्या तापलेल्या रनामधून दोन्ही गटाने जे काय पेरले ते रविवारी उगवणार आहे. सोमवारी ‘किस में कितना है दम’ हे मतपेट्यांमधून उघड होणार आहे.

महाडिक गटाने या मुद्यांवर पेटवले रान

* कारखाना अडचणीत होता तरीपण, ऊस बिले दिली * कामगारांच्या देय रक्कम थकल्या, पण लवकरच त्या देऊ * कारखान्याला कर्जाच्या खार्ईत लोटले, हा आरोप अत्यंत निराधार व चुकीचा * कारखाना विस्तारीकरणाच्या खर्चाचा बोजा शेतकर्‍यांवर न पडू देणारा राज्यातील पहिला कारखाना * विस्तारण आणि उपपदार्थ निमिर्तीचे प्रकल्प हाती घेतल्याने कारखान्याला पर्यायाने सभासदांना येणार अच्छे दिन * भीमा कारखाना बंद पाडण्याचा विरोधकांचाच कुटील डाव * कारखान्याची तब्बल 18 कोटींची मुद्दामहून भिजवली साखर * भीमा कारखान्यांवरच विरोधकांनी लोकनेते कारखाना उभा केला * अडचणीत असतानाही, ‘भीमा’ने या वर्षीच्या गाळपाचा दर जाहीर केला, लोकनेते कारखाना दर अजूनही का जाहीर करत नाही * लोकनेते कारखान्यावर होते मापात पाप, मारला जातो काटा * भीमा कारखान्यावर काटा मारलेला आढळल्यास बक्षीस * लोकनेते कारखान्याचे खासगीकरण * शेतकरी सभासदांवरील दादागिरी * नक्षत्र प्रकरण * लोकनेते सरकारी मदतीच्या पॅकेजमधून झाला कर्जमुक्त

पाटील - परिचारक गटाने या मुद्यांवर तापवले रणांगण

* महाडिक गटाने भीमा कारखाना लोटला कर्जाच्या खाईत* कारखान्यावर साडेचारशे कोटींच्या कर्जाचे मुद्दल आणि दीडशे कोटी व्याज * गुंठा जमीन नावावर नसताना उचलेली कर्जे, भीमा कारखान्यात सत्ताधार्‍यांनी कला भ्रष्टाचार * कारखान्याकडील कामगारांच्या पगारी न करता, त्यांना सोडले वार्‍यावर * महाडिक यांचे पार्सल कोल्हापूरला परत पाठवू * स्व.सुधारकरपंत परिचारक यांचे कारखान्याचे स्वप्न साकार करण्यासाठी निवडणुकीचे पॅनल *

काही खास नोंदी...

* प्रचाराच्या ठोस मुद्यांवर पाटील-परिचारक गट राहिला पिछाडीवर

*‘भीमा’ वरील कर्जाचा डोंगर याशिवास ठोस मुद्दाच नाही पाटील - पचिारक गटाकडे

* प्रचार यंत्रणेत सत्ताधारी भीमा परिवार गटाची आघाडी दिसत आहे

* लोकनेते खासगीकरण, या कारखान्याचा यंदाचा दर, नक्षत्र प्रकरण या मुद्यांवर राजन पाटील यांच्याकडून समर्पक उत्तरांचा दिसला अभाव

* कारखान्यांमधील मुद्यांपेक्षा वैयक्तीक पातळीवरील टीकेचाच प्रचार सभांमध्ये राहिला भडिमार

* राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या प्रचारा सभांमधील वक्तव्याने निवडणूक झाली ‘हाय व्होलेट’

* उमेश पाटील, लक्ष्मण ढोबळे, विजयराज डोंगरे, रमेश बारसकर, मानाजी माने, प्रभाकर देशमुख आदींमुळे महाडिक गटाला आले हत्तीचे बळ

* भया ऊर्फ प्रभाकर देशमुखांच्या दूटप्पी भूमिकेवर ऐन प्रचारात तापलेल्या रनात झाली उलट - सुलट चर्चा

* प्रशांत परिचारक आणि राजन पाटील या दोघांच्या एकत्रीत दिसल्या नाहीत सभा

भाजप-राष्ट्रवादी विरुध्द भाजप-राष्ट्रवादी सामना

भीमा कारखान्याच्या निवडणुकीचा पक्षीय पातळीवर विचार केल्यास ही निवडणूक भाजप - राष्ट्रवादी विरुध्द भाजप - राष्ट्रवादी अशीच रंगली आहे. भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत राष्ट्रवादीचे उमेश पाटील, रमेश बारसकर,मानाजी माने हे नेते आहेत. दुसरीकडे माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीचे तर आणि परिचारक हे भाजपचे आहेत. त्यामुळे कार्यकर्तेदेखील बुचकाळ्यात पडले आहेत.

शिवाजी भोसले उपसंपादक सकाळ सोलापूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com