Solapur : "भाजप सरकारला पायउतार करण्याची वेळ आली आहे" डॉ धवलसिंह मोहिते पाटील

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.त्यावेळी झालेल्या सभेत डॉ. धवलसिह बोलत होते.
solapur
solapur sakal

मोहोळ - आदानी उद्योग समूहा विषयी विचारलेल्या प्रश्नामुळे उद्विग्न झालेल्या नरेंद्र मोदी सरकारने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली असल्याचा आरोप करीत, येणाऱ्या निवडणुकीत महागाईच्या विरोधात, सर्वसामान्य जनतेच्या अडचणीच्या विरोधात न बोलणाऱ्या भाजप सरकारला पायउतार करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.त्यावेळी झालेल्या सभेत डॉ. धवलसिह बोलत होते.

solapur
Mumbai : विमातळावर एरोड्रोम रेस्क्यू अँड फायर फायटिंग सर्व्हिसेसचे प्रात्यक्षिक!

मोहिते पाटील पुढे म्हणाले, देशाची सर्वसामान्य जनता महागाईमुळे होरपळत आहे . मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महागाईच्या संदर्भात बोलायला तयार नाहीत. ते सर्वसामान्य जनतेचा विचार करीत नाहीत.

देशाचे नेते राहुल गांधी यांनी महागाई विरोधात पाऊल उचलल्याने त्यांच्यावर खासदारकी रद्द करण्याचे तसेच शासकीय निवासस्थाना तुन त्यांना बाहेर काढण्याचे कारस्थान पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. भूलथापा मारून सत्तेत आलेले हे सरकार येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाय उतार करण्याची वेळ आली आहे.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तांबोळी, बाबासाहेब क्षीरसागर, महिला काँग्रेस च्या अध्यक्षा शाहीन शेख,निरीक्षक विजय हत्तुरे,अशोक देशमुख,देवानंद पाटील,भीमराव बाळगे,अभिराज शिंदे,सुधीर लांडे,रमेश हसापुरे,

मुन्ना हरणमारे, कांतीलाल राऊत, बिलाल शेख,सुदर्शन आवताडे,शाहीर हावळे,भीमराव वसेकर,यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील यांना निवेदन देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com