esakal | भाजपला झटका ! अखेर कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा ठरला मुहूर्त !

बोलून बातमी शोधा

Kalyanrao_Kale

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर कल्याणराव काळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या कारखानदारीच्या अडचणी सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही. 

भाजपला झटका ! अखेर कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा ठरला मुहूर्त !
sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर येथील भारतीय जनता पक्षाचे नेते व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी अखेर भारतीय जनता पक्षाला राम राम करण्याचा निर्णय घेतला असून, गुरुवारी (ता. 8) उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर कल्याणराव काळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या कारखानदारीच्या अडचणी सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही. विठ्ठल परिवारातील घटक असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी दिली आहे. त्यानंतर काळे यांनी भाजप सोडण्याचा निर्यण घेतला आहे. 

मागील आठवडाभरातील चर्चेनंतर कल्याणराव काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर येथील कोर्टी रोडवरील श्रीयश पॅलेस येथे गुरुवारी पक्ष प्रवेश होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे. 

दरम्यान, काळे यांच्या सततच्या राजकीय धरसोड भूमिकेविषयी कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल