

“Solapur BJP faces growing unrest — Malak and Bapu supporters protest against new party entrants.”
Sakal
सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्ष प्रवेशाविरोधात आमदार सुभाष देशमुख समर्थकांनी थेट पक्षाच्या कार्यालयासमोर धरणे धरले होते. त्यानंतर आज (सोमवारी) आमदार विजयकुमार देशमुख समर्थक कार्यकर्त्यांनीही प्रभाग पाचमधील अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांच्या प्रवेशाविरोधात कार्यालयासमोर निदर्शने केली. याप्रसंगी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना निवेदन देताना कार्यकर्त्यांची व त्यांची शाब्दिक खडाजंगीही झाली.