सोलापूर : गरिबांची मुले गणवेशाविनाच शाळेत

दीड महिन्यांत एकालाही नाही नवीन गणवेश
school uniforms
school uniformsesakal

सोलापूर : शाळेच्या पहिल्याच दिवशी गोरगरिब मुलांना मोफत गणवेश द्यावेत, असे सरकारचे आदेश होते. मात्र, १५ जूनपासून शाळा सुरु होऊन आता दीड महिने झाले, पण त्या मुलांना गणवेश मिळालेच नाहीत. त्यामुळे हातावरील पोट असलेल्यांची एक लाख ४८ हजार ४०५ विद्यार्थी (पहिली ते आठवी) जुन्याच कपड्यांवर शाळेत येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील मुलांसह अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना हे मोफत गणवेश दिले जातात.

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९७ तर महापालिका, नगरपालिकांच्या ७५ शाळांमधील जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन, या प्रमाणे तीन लाख गणवेश मिळणे अपेक्षित आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी पापरी (ता. मोहोळ) येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी एका चिमुकलीकडे गणवेशाबद्दल विचारपूस केली.

तेव्हा कोरोनामुळे मुलांना एकच गणवेश मिळाल्याची बाब समोर आली. मुंबईला गेल्यानंतर तातडीने त्यांनी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीचा गणवेशाचा २१५ कोटींचा निधी तातडीने वितरीत केला. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व मुलांना गणवेश मिळावेत म्हणून २९ एप्रिल रोजी निधी जिल्ह्यांना वर्ग झाला. मात्र, अजूनपर्यंत तो निधी शाळा व्यवस्थापन समित्यांना मिळालेला नाही. त्यामुळे एकाही मुलाकडे नवीन शैक्षणिक वर्षाचा गणवेश नसल्याची गंभीर स्थिती आहे. पण, प्रशासन बॅंकांची तांत्रिक अडचण समोर करून वेळ मारून नेत असल्याचेही चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com