कोरोनामुळे 52 जणांचा मृत्यू ! एकाच दिवशी आढळले 1993 नवीन कोरोनाबाधित

सोलापूर शहर व जिल्ह्यात बुधवारी कोरोनामुळे मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे
Corona
CoronaMedia Gallary

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचे (Covid-19) संकट दाखल झाल्यापासून एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यूची नोंद आज सोलापूर शहर व ग्रामीण भागात झाली आहे. ग्रामीण भागातील 34 तर महापालिका हद्दीतील 18 अशा एकूण 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. (Solapur city and district has the highest number of deaths due to corona on Wednesday)

आज एकाच दिवशी 1993 नव्या कोरोना बाधितांची भर जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली आहे. त्यातील 1830 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत तर महापालिका हद्दीत आज नवीन 163 रुग्ण आढळले आहेत. आज एकाच दिवशी 1608 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यातील 1225 जण हे ग्रामीण भागातील तर 383 जण हे महापालिका हद्दीतील आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यात सध्या 18 हजार 350 एवढे ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्ण असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यातील 16 हजार 431 जण हे ग्रामीण भागातील तर 1919 जण हे महापालिका हद्दीतील आहेत.

Corona
शंभर कोटी खर्चून दौंड लोको शेडचे काम सुरू ! दोनशे इलेक्‍ट्रिक इंजिन दुरुस्तीची असणार क्षमता

आज ग्रामीण भागात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक 345, माळशिरस तालुक्‍यात 288, करमाळा तालुक्‍यात 230, बार्शी तालुक्‍यात 212, माढा तालुक्‍यात 186, सांगोला तालुक्‍यात 161 तर मंगळवेढा तालुक्‍यातील 174 नव्या कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे.

पंढरपूर व माढ्यातील प्रत्येकी आठ रुग्णांचा मृत्यू

सोलापूर ग्रामीण भागातील तब्बल 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये पंढरपूर व माढा तालुक्‍यातील प्रत्येकी आठ व्यक्तींचा समावेश आहे. बार्शी व मंगळवेढा तालुक्‍यातील प्रत्येकी चार, माळशिरस तालुक्‍यातील तीन, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील पाच व उत्तर सोलापूर तालुक्‍यातील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com