फेसबुकवर पॉर्न व्हिडिओ, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक

Crime-Story
Crime-Story
Summary

सोशल मिडियावर, इंटरनेटवर अश्‍लिल चाईल्ड प्रोर्नोग्राफी सर्च करणे, पाहणे, शेअर करणे कायद्याने गुन्हा आहे.

सोलापूर : सोशल मिडियावर (Social Media) अश्‍लिल चाईल्ड प्रोर्नोग्राफीचा व्हिडिओ (video of pornographic) अपलोड करणाऱ्याला सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली. मनिष विजयराज बंकापुर (वय 23) असे अटक (arrest) केलेल्या तरूणाचे नाव आहे. तो सध्या शिक्षण घेत असून पोलिसांना महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून (Maharashtra Cyber ​​World Trade Center) त्यासंबंधीच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त बापूर बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या तरूणाचा शोध घेण्यात आला. (Solapur city police have arrested a man for uploading a video of pornographic child pornography on social media)

Crime-Story
'एमपीएससी'च्या परीक्षांचा बदलणार निकाल

सोशल मिडियावर, इंटरनेटवर अश्‍लिल चाईल्ड प्रोर्नोग्राफी सर्च करणे, पाहणे, शेअर करणे कायद्याने गुन्हा आहे. संबंधिताला पहिल्या दोषसिध्दीस पाच वर्षाची कैद तर दहा लाखांच्या दंडाची शिक्षा आहे. तर दुसऱ्यांदा दोषारोप सिध्द झाल्यास त्याला सात वर्षांची कैद आणि दहा लाखांचा दंड, अशी शिक्षेची तरतूद आहे. अशा बाबींवर सायबर क्राईमचा वॉच असून संबंधितांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाईदेखील केली जात आहे. सोलापुरातील तरूणावर अशीच कारवाई करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून सोलापूर पोलिसांकडे ही केस पाठविण्यात आली होती.

Crime-Story
ग्रामीणमध्ये 36 दिवसांत 1055 मृत्यू! शहरातील परिस्थिती आली आटोक्‍यात

त्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या पथकाने त्या तरूणाची खात्री केली. त्याच्या मोबाईलचा 'आयपी' ऍड्रेसचा शोध घेऊन त्याचा मोबाइल क्रमांक मिळविला. त्यानंतर त्याला त्याच्या घरातून (पूर्व मंगळवार पेठ, गांगजी चादर शोरूममागे, कौतम चौक) पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक होटकर, पोलिस नाईक संतोष येळे, सचिन गायकवाड, बाबू मंगरूळे, अमोल कानडे, करण माने, इब्राहिम शेख, वसीम शेख, प्रविण शेळकंदे, प्रांजली काळे, पुजा कोळेकर, अर्जुन गायकवाड, राजू राठोड, कपिल पिरजादे यांच्या पथकाने केली.

Crime-Story
दहावीचा निकाल जुलैमध्ये तर ऑगस्टमध्ये बारावीचा निकाल

'इलेक्‍ट्रॉनिक्‍स'च्या अंतिम वर्षातील तरूण

कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून महाविद्यालये बंदच आहेत. त्यामुळे तो तरूण घरातच बसून आहे. त्याने दोन-अडीच महिन्यांपूर्वी सोशल मिडियावर अश्‍लिल व्हिडीओ शेअर केला होता. त्याच्या वडिलांचे हार्डवेअर इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे दुकान असून तो तरूण अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स शाखेतून त्याचे शिक्षण सुरू असल्याची माहिती साळुंखे यांनी दिली. त्याला त्याच्या घरातूनच अटक केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Solapur city police have arrested a man for uploading a video of pornographic child pornography on social media)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com