ग्रामीणमध्ये 36 दिवसांत 1055 मृत्यू! शहरातील परिस्थिती आली आटोक्‍यात

ग्रामीणमध्ये 36 दिवसांत 1055 मृत्यू! शहरातील परिस्थिती आली आटोक्‍यात
Updated on
Summary

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात एक लाख 54 हजार 290 जणांना कोरोनाची बाधा झाली.

सोलापूर : शहरातील कोरोनाची (Corona) दुसरी लाट आटोक्‍यात येत असतानाच ग्रामीण (rural areas) भागातील मृतांची (corona deaths) संख्या अजूनही चिंताजनक आहे. प्रामुख्याने अक्‍कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ, माळशिरस या तालुक्‍यात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे. मागील 36 दिवसांत तब्बल एक हजार 55 रुग्णांचा मृत्यू झाला असून, शनिवारी (ता.5) पाच जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शहरात शनिवारी 15 तर ग्रामीणमध्ये 460 रुग्णांची वाढ झाली आहे. शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून, ग्रामीणमधील मात्र 23 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. (corona deaths are on the rise in rural areas of solapur district)

ग्रामीणमध्ये 36 दिवसांत 1055 मृत्यू! शहरातील परिस्थिती आली आटोक्‍यात
तरुणास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण ! वाचा सोलापूर शहरातील घात-अपघात व गुन्हेगारी वृत्त 

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात एक लाख 54 हजार 290 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी एक लाख 45 हजार 705 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या चार हजार 490 रुग्णांवर उपचार सुरू असून चिंतेची बाब म्हणजे कोरोनाने शहर-जिल्ह्यातील चार हजार 95 रुग्णांचा आतापर्यंत बळी घेतला आहे. शनिवारी अक्‍कलकोट तालुक्‍यात 20 रुग्ण वाढले असून तब्बल पाच रुग्ण दगावले आहेत. बार्शीत 53, माळशिरसमध्ये सर्वाधिक 107, मोहोळमध्ये 23, उत्तर सोलापुरात तीन रुग्ण वाढले असून या तालुक्‍यांतील प्रत्येकी चार रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सांगोल्यात 27 रुग्ण वाढले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे करमाळा, माढा, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर या तालुक्‍यातील एकाही रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला नाही. रुग्णसंख्या कमी होत असतानाही मृत्यूदर कायम असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून मृत्यू रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे.

ग्रामीणमध्ये 36 दिवसांत 1055 मृत्यू! शहरातील परिस्थिती आली आटोक्‍यात
सोलापूर शहरातील रुग्णालयांमध्ये अद्ययावत सुरक्षा यंत्रणांची उभारणी 

शहरातील 24 नंबर प्रभागाकडे लक्ष द्या?

शहरातील कोरोनाची लाट आटोक्‍यात येत असून, रुग्णसंख्या दोन अंकी झाली आहे. शनिवारी शहरातील एकूण 26 प्रभागांमध्ये 15 रुग्ण वाढले असून त्यातील सर्वाधिक चार रुग्ण प्रभाग क्र. 24 मधील आहेत. प्रभाग क्र. 20, 25 व 26 मध्ये प्रत्येकी दोन तर प्रभाग क्र. 3,5,14,16 व 22 मध्ये प्रत्येकी एक रुग्ण वाढला आहे. शहरातील बहुतेक प्रभाग कोरोनामुक्‍त होत असतानाच 22 ते 26 या प्रभागांमध्ये ठोस उपाययोजना करून त्याठिकाणचे रुग्ण कमी करण्याची गरज आहे. तरीही प्रशासनाकडून त्याकडे लक्ष दिले जात नसल्याची वस्तूस्थिती आहे.

ग्रामीणमध्ये 36 दिवसांत 1055 मृत्यू! शहरातील परिस्थिती आली आटोक्‍यात
सोलापूर महापालिकेचा मोठा निर्णय! शहरातील बससेवेला सोमवारपासून प्रारंभ पण... 

म्युकरमायकोसिसचे वाढले 12 रुग्ण

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत असतानाच आता म्युकरमायकोसिस या आजाराच्या नव्या संकटाने प्रशासनाची चिंता पुन्हा वाढली आहे. 8 मेनंतर शहर-जिल्ह्यात 395 रुग्ण आढळले असून त्यातील 29 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 114 रुग्ण बरे झाले असून 222 रुग्णांवर 31 रुग्णालयातून उपचार सुरू आहेत. आज 12 रुग्ण वाढले आहेत. (corona deaths are on the rise in rural areas of solapur district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
solapur
MLA Devendra Kothe  
Marathi News Esakal
www.esakal.com