
सोलापूर : मंद्रूप हद्दीतील नाईक नगर तांड्यावरील (ता. दक्षिण सोलापूर) गोपाळ बाबू चव्हाण या तरुणाने शेजारील रतन धारू चव्हाण (वय ७५) यांच्या डोक्यात, हातावर, सर्वांगावर विनाकारण काठीने जबर मारहाण केली. जखमी अवस्थेत रतन चव्हाण यांना २४ ऑगस्ट रोजी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी (ता. २६) रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने संशयित आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.